ज्वेलर्सनंतर आता आयकर विभागाची बिल्डरांवर नजर

ज्वेलर्स आणि हवाला ऑपरेटर्सनंतर आता बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत. 500 आणि 1000च्या जुन्या नोटा घेऊन प्रॉपर्टी विकणाऱ्या बिल्डरवर आयकर विभागाची करडी नजर आहे.  

Updated: Nov 19, 2016, 05:53 PM IST
 ज्वेलर्सनंतर आता आयकर विभागाची बिल्डरांवर नजर title=

नवी दिल्ली : ज्वेलर्स आणि हवाला ऑपरेटर्सनंतर आता बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत. 500 आणि 1000च्या जुन्या नोटा घेऊन प्रॉपर्टी विकणाऱ्या बिल्डरवर आयकर विभागाची करडी नजर आहे.  

नोटबंदीच्या निर्णयानंतर अनेक नावाजलेल्या बिल्डरांनी 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा स्वीकारून व्यवहार केले आहेत. आयकर विभागातर्फे करण्यात आलेल्या सर्वेनुसार देशातील दिल्ली-एनसीआर, बंगळूर , मेरठ, अलाहाबाद, कोलकाता आणि मध्यप्रदेश अशा वेगवेगळ्या शहरातील बिल्डरांनी अशाप्रकारे प्रॅापर्टी विकल्या आहेत.

त्यामुळे आयकर विभागाकडून अमान्य नोटा घेणाऱ्या बिल्डरांकडील पैशांची
चौकशी सुरू आहे. नोटबंदी निर्णयाच्या आधी अनेक बिल्डर्स प्रोजेक्टस पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या  मार्गांनी पैसा जमवत होते. याप्रकरणी अनेकवेळा त्यांना दंड भरण्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या चढव्या लागल्या होत्या. पण नोटबंदी झाल्यानंतर बिल्डरांकडे मोठ्याप्रमाणावर पैसा जमा झाला आहे. अशाच पैशांचा स्त्रोत तपासण्यासाठी आयकर विभागाचे धाडसत्र सुरू आहे.