<B> <font color=red>नरेंद्र मोदी:</font></b> जनतेचे आभार, त्यांनी एका चहावाल्याला मुख्यमंत्री केलं

नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअमवर आज भारत स्वाभिमान ट्रस्टच्या स्थापना दिवसाच्या कार्य़क्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात योगगुरु रामदेवबाबांसोबत भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सुद्धा उपस्थित आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सरकारवर टीका करत जनतेचे आभारही मानले आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 5, 2014, 09:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअमवर आज भारत स्वाभिमान ट्रस्टच्या स्थापना दिवसाच्या कार्य़क्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात योगगुरु रामदेवबाबांसोबत भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सुद्धा उपस्थित आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सरकारवर टीका करत जनतेचे आभारही मानले आहेत.
काय म्हणाले मोदी
> जीएसएलव्ही डी-५च्या यशस्वी लॉन्चिंगबद्दल वैज्ञानिकांचं केलं अभिनंदन
> हा देश खूप महान आहे, या देशानं एका चहावाल्याला मुख्यमंत्री केलं- मोदी
> आगामी लोकसभा निवडणूक म्हणजे जनआंदोलन- मोदी
>आपण आपल्या भाषेवर गर्व करायला शिकायला हवं. विकासासाठी मंगळावरुन माणसं आणण्याची गरज नाही. आमचा संकल्प दिव्य, भव्य भारत निर्माण करणं हवा.
>बाबा रामदेव आणि त्यांच्या ट्रस्टनं भाजप आणि माझ्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत. त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, असंही मोदी आपल्या भाषणात म्हणाले. प्रत्येक समस्येचं समाधान शोधल्या जावू शकतं.
>कोणत्याही पदासाठी आमचा जन्म नाही, काही करु शकलो नाही, तर जगण्याला अर्थ नाही.
>देशाला आश्वासनं नाही धेय्य हवं. भ्रष्टाचाराचा नायनाट प्रामाणिकतेने होईल. अधिकारशाही वाढतेय त्याचा खात्मा व्हायला हवा.
>स्किल डेव्हलपमेंटवर केंद्र सरकार गंभीर नाही. जीडीपी दर वाढवायचा आहे तर उत्पादन क्षमताही वाढवायला हवी. योग्य योजनांद्वारे
अर्थव्यवस्थेत बदल केला जावू शकतो. जमिनीचा योग्य वापर होण्याची गरज आहे. जकात कर रद्द करायला पाहिजे.
>आज देशात विकासाच्या मुद्यावर चर्चा होतेय, ही चांगली बाब आहे. विकासाची राजनिती करण्याचा दबाव सर्वच राजकीय पक्षांवर हवा.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.