`आईबाबांकडे माझ्यासाठी कोट घ्यायलाही पैसे नव्हते`

शाळेत होतो, तेव्हा आईबाबांकडे माझ्यासाठी कोट घ्यायलाही पैसे नव्हते, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देतांना सांगितलं.

Updated: Jan 24, 2014, 02:03 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली
शाळेत होतो, तेव्हा आईबाबांकडे माझ्यासाठी कोट घ्यायलाही पैसे नव्हते, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देतांना सांगितलं.
आर के पुरम भागातील दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांशी झालेल्या एका परिसंवादात रघुराम राजन यांनी आपल्या बालपणाच्या आठवणी सांगितल्या. रघुराम राजन हे याच शाळेचे विद्यार्थी आहेत.
मुक्त अर्थव्यवस्थेत तुमच्या पिढीला चांगल्या रोजगाराची संधी असल्याचंही यावेळी, रघुराम राजन यांनी स्पष्ट केलं. दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपला माजी विद्यार्थी रघुराम राजन यांचं उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केलं.
तेव्हा १९७४ साली आपल्याला या शाळेत टाकण्यात आलं, मात्र यासाठी आपल्या आईबाबांनी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, असं रघुराम राजन यांनी सांगितलं.
लहाणपणी आपल्याकडे एक कोटही नव्हता
पब्लिक स्कूलच्या मुलांना कोट असतो, मात्र रघुराम राजन यांच्याकडे कोट नसल्याने ते स्वेटर वापरत होते. आज पब्लिक स्कूलच्या मुलांना दोन-दोन कोट असतात, पण लहाणपणी आपल्याकडे एक कोटही नव्हता.
कारण माझ्या आईवडिलांकडे माझ्यासाठी एक कोट घेण्यासाठीही पैसे नव्हते, आणि तुम्ही आजूबाजूला पाहा, मागील दहा वर्षात जग किती बदललंय, असं सांगून मुक्त अर्थव्यवस्थेमुळे केवढे मोठे बदल झाले आहेत, यांचं उत्तम उदाहरण आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिलं.
रोजगाराच्या आज मोठ्या संधी
जेव्हा मी शाळेत आणि महाविद्यालयात होतो, तेव्हा डॉक्टर आणि इंजीनिअर या मर्यादीत संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत्या. म्हणजे त्यावेळी प्रत्येकालाच वाटायचं की, मी डॉक्टर नाही तर इंजीनिअर व्हावं, पण आता तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.
यात मीडियापासून तुम्ही एक उत्तम शेफ होऊ शकतात, किंवा प्राध्यापक किंवा बँकेतही चांगल्या पदावर नोकरीची संधी पटकावू शकता, अशी प्रेरणाही यावेळी रघुराम राजन यांनी दिली.
लहाणपणी बँजो वाजायला आवडायचं
रघुराम राजन पुढे बोलतांना म्हणाले, तुम्हाला नोकरी मिळवण्याची संधी आहे, ती फार सहज मिळू शकते, असं मला म्हणायचं नाही. मला एवढं म्हणायचं आहे की, जागतिकीकरणामुळे आज स्पर्धा वाढलीय, तंत्रज्ञान खूप बदललंय, हे आमच्या वेळेस नव्हतं.
रघुराम राजन यांनी आपले ऑर्केस्ट्रा स्कूलच्या आठवणींनाही या वेळी उजाळा दिला. मी बँजो वाजवण्याची आवड होती, मी संगीतात काही फार पारंगत होतो असं नाही, पण हळहळू का असेना मी शिकलो, मी नियमित पण काही दिवस बँजो वाजवलाही, पण आता ते सारं बाजूला पडलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.