मुलायम सिंह यांचा मुलगा आणि सून योगी आदित्यनाथांच्या भेटीला

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचा मुलगा प्रतीक यादव आणि सून अपर्णा यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊला पोहोचले.

Updated: Mar 24, 2017, 10:44 AM IST
मुलायम सिंह यांचा मुलगा आणि सून योगी आदित्यनाथांच्या भेटीला title=

लखनऊ : समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचा मुलगा प्रतीक यादव आणि सून अपर्णा यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊला पोहोचले.

योगी आदित्यनाथ मागील काही दिवसांपासून व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसमध्येच राहत आहेत आणि सगळ्या महत्त्वाच्या बैठकाही तेथूनच होत आहे. मुलायम सिंह यादव यांची लहान सून अपर्णा यादव यांनी कैंट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भाजपच्या रीता बहुगुणा जोशी यांनी त्यांचा पराभव केला आहे.
 
अपर्णा यादव मागील काही दिवसांपासून राजकारणात खूपच सक्रिय झाल्या आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्या सामाजिक क्षेत्रात काम करत होत्या. अपर्णा यादव यांनी अनेकदा पंतप्रधान मोदींचं कौतूक देखील केलं आहे.