नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचे व्यवहार येत्या सहा ते सात महिन्यात पेपरलेस होतील, असं आश्वासन सरन्यायाधीश जे.एस. केहर यांनी दिलं आहे. एका प्रकरणामध्ये जलद निवाड्याची मागणी करणारी याचिका कोर्टात आली आहे. त्यावर भाष्य करताना केहर यांनी लवकरच सुप्रीम कोर्टाचे व्यवहार ऑनलाईन होणार असल्याचं सांगितलं.
ट्रायल कोर्ट आणि हायकोर्टामध्ये असलेली कागदपत्रं इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं बघितली जातील. त्यामुळे त्या कोर्टांमधल्या खटल्यांची बोजड कागद नव्यानं सादर करण्याचा वेळ वाचेल, असं केहर यांनी स्पष्ट केलं.