अनंत अंबानीने १८ महिन्यात घटवले १०८ किलो वजन

देशातील सगळ्यात श्रीमंत बिझनेसमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने गेल्या १८ महिन्यांत तब्बल १०८ किलोपर्यंत वजन कमी केलेय.

Updated: Apr 10, 2016, 11:16 AM IST
अनंत अंबानीने १८ महिन्यात घटवले १०८ किलो वजन  title=
सौजन्य - फेसबुक

मुंबई : देशातील सगळ्यात श्रीमंत बिझनेसमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने गेल्या १८ महिन्यांत तब्बल १०८ किलोपर्यंत वजन कमी केलेय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून अनंत वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतोय. त्यामुळे त्याने तब्बल १०८ किलो वजन घटवलेय. 

अनंतने आपल्या २१व्या बर्थडेसाठी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. दररोज नियमितपणे व्यायाम तसेच योगा, वॉक, डाएटमुळेच तो वजन घटवू शकला. 

आपल्या मुलाने वजन घटवण्यासाठी घेतलेले परिश्रम पाहून अनंतची आई नीता अंबानी यामुळे चांगलीच खुश झालीये.