यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस- हवामान विभाग

भारतातील मॉन्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी असणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. ही माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलीय.

Updated: Apr 22, 2015, 04:03 PM IST
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस- हवामान विभाग title=

नवी दिल्ली : भारतातील मॉन्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी असणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. ही माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलीय.

सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवल्यावर साधारणत: तो पाऊस आधीच्या पावसापेक्षा कमी प्रमाणात असतो, म्हणून शेतकऱ्यांसाठी हा चिंतेचा विषय आहे.

मात्र मे महिन्यात हवामान खात्याचा आणखी एक हवामानाचा अंदाज येतो, तो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असेल का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

गेल्या काही महिन्यांत देशभरातील विविध राज्यांत अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आता बळीराजाचे मॉन्सूनकडे लक्ष लागले आहे. दरवर्षी हवामान विभागाकडून मान्सूनचा अंदाज वर्तविला जातो. 

हर्ष वर्धन म्हणाले, की यंदाचा मॉन्सून सामान्यच राहणार असून, सरासरीच्या कमी म्हणजे 93 टक्के पाऊस पडेल. यंदाच्या मॉन्सूनवर एल-निनो वादळाचा परिणाम होईल. 

सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता २८ टक्के असून, सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता ३३ टक्के आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.