बळीराजाच्या चिंतेत वाढ, यंदा पाऊस कमी - आयएमडी

आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं त्रस्त असलेल्या बळीराजाची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानं यंदा पाऊस सरासरी पावसाच्या फक्त 93 टक्केच होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय. 

Updated: Apr 22, 2015, 07:36 PM IST
बळीराजाच्या चिंतेत वाढ, यंदा पाऊस कमी - आयएमडी title=

नवी दिल्ली: आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं त्रस्त असलेल्या बळीराजाची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानं यंदा पाऊस सरासरी पावसाच्या फक्त 93 टक्केच होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय. 

आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. देशात सरासरी पाऊस पडण्याची शक्यता फक्त 28 टक्के असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं भाकितही हवामान खात्यानं वर्तवलं आहे.

काही दिवसांपूर्वी स्कायमेटनं व्यक्त केलेल्या अंदाजाच्या अगदी विरुद्ध अंदाज भारतीय हवामान खात्यानं दर्शविला आहे. स्कायमेटनं देशात 102 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळं बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला होता. पण आता आयएमडीच्या अंदाजानंतर बळीराजाची चिंता आणखी वाढणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.