गणिताचे सूत्र लक्षात ठेवण्यासाठी कंबरेवर काढला टॅटू

लहान असताना आपण सर्वांनी गणिताचे सूत्र लक्षात ठेवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या असतील. त्यासाठी कोणी सूत्र पाठांतर, तर कोणी एका कागदावर लिहून कॉपी करतात, असे नाना प्रकार आपण केले आहेत.

Updated: Oct 18, 2014, 07:56 PM IST
गणिताचे सूत्र लक्षात ठेवण्यासाठी कंबरेवर काढला टॅटू title=

नवी दिल्ली : लहान असताना आपण सर्वांनी गणिताचे सूत्र लक्षात ठेवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या असतील. त्यासाठी कोणी सूत्र पाठांतर, तर कोणी एका कागदावर लिहून कॉपी करतात, असे नाना प्रकार आपण केले आहेत.

पण, १९ वर्षाच्या रॉरी किर्कमान या विद्यार्थ्य़ांने गणिताचे सूत्र लक्षात ठेवण्यासाठी कंबरेवर  टॅटू काढला आहे. हा धक्कादायक प्रकार एका इंग्रजी दैनिकातून छापून आला आहे. यावरून त्याने गणिताचे सूत्र लक्षात राहण्यासाठी हा उपाय शोधल्याचं समजतंय.

गणिताचे सूत्र लक्षात ठेवताना त्याला नेहमी त्रास होत होता. या त्रासातून सुटका होण्यासाठी त्यांनी हे पाऊल टाकल्याचे किर्कमानने त्याच्या मित्रांना सांगितले.

इंग्लंडच्या ब्रिस्टलमधील वेस्ट युनिवर्सिटीने सायकॉलझी आणि क्रिमिनॉलझीचा विद्यार्थी रॉरीने सांगितले की, 'सलग दोन वर्ष गणिताच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याने तिसऱ्या वर्षी गणिताची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. '

'मला चांगले गुण मिळत नसल्यामुळे माझे मित्र मला खूप चिडवत होते. त्याला असे वाटत होते की, मी गणिताच्या परीक्षेत पास होणार नाही, असे सर्वाना वाटत होते. मला त्याचा हा समज खोटा पाडायचा होता', असे रॉरीने म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.