नवरा म्हणतोय माझी पत्नीला सात-सात पती....

 आज आम्ही तुम्हाला अशी बातमी सांगणार आहोत त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.  एका महिलेनं आपल्या पतीला अंधारात ठेवून एक नाही दोन नाही तर तब्बल सात लग्न केल्याची कधी ऐकिवात नसलेली घटना घडली आहे.  कर्नाटकातील बेंगळुरू येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.

Updated: Sep 20, 2016, 08:03 PM IST
नवरा म्हणतोय माझी पत्नीला सात-सात पती.... title=

बंगळुरू :  आज आम्ही तुम्हाला अशी बातमी सांगणार आहोत त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.  एका महिलेनं आपल्या पतीला अंधारात ठेवून एक नाही दोन नाही तर तब्बल सात लग्न केल्याची कधी ऐकिवात नसलेली घटना घडली आहे.  कर्नाटकातील बेंगळुरू येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.

इमरान असे तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पूर्व बंगळुरूमधील केजी हल्ली भागात तो राहतो. त्यानं आपली ३८ वर्षीय पत्नी यास्मीन बानू (बदललेले नाव) हिच्याविरोधात जीवघेणा हल्ला आणि फसवणुकीची तक्रार केली आहे. तसेच  यास्मीनचे आणखी सात नवरे आहेत, असं इमराननं तक्रारीत म्हटलं आहे. 

आश्चर्य म्हणजे, शोएब आणि अफझल या दोन इसमांनी यास्मीननं आपल्याशी लग्न केल्याची कबुलीही दिली आहे. यास्मीनला पैसे हवे होते, पण मी ते न दिल्यानं तिनं मला सोडलं, असं व्यवसायानं रिअल इस्टेट एजंट असलेल्या अफझलनं पोलिसांना सांगितलं आहे. 

पोलिसांनी यास्मीनविरोधात हल्ल्याचा गुन्हा दाखल केला असून फसवणुकीच्या आरोपाची चौकशी सुरू केली आहे.