श्रीमंतांना आता महाग मिळणार स्वयंपाकाचा गॅस?

 श्रीमंतांना स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर (एलपीजी) वर देण्यात येणारे अनुदान (सबसिडी) बंद करण्याचा विचार करीत आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शुक्रवारी यासंदर्भातील संकेत दिले आहेत. 

Updated: Nov 21, 2014, 08:07 PM IST
श्रीमंतांना आता महाग मिळणार स्वयंपाकाचा गॅस? title=

नवी दिल्ली  :  श्रीमंतांना स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर (एलपीजी) वर देण्यात येणारे अनुदान (सबसिडी) बंद करण्याचा विचार करीत आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शुक्रवारी यासंदर्भातील संकेत दिले आहेत. 

जेटलीने येथे एका मीडिया हाऊसच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, भारताला आता पुढचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा आहे की, माझ्या सारख्या लोकांनना एलपीजी सबसिडी मिळाली पाहिजे का?  लवकरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल की कोणाला सबसिडी मिळायला हवी. ते आपल्या एकूण कार्यप्रणालीसाठी योग्य होईल. सध्या ग्राहकांना दरवर्षी १२ सिलेंडर सबसिडी दरात म्हणजे प्रति सिलेंडर ४१४ रुपयांना (दिल्लीत) मिळतात. यापेक्षा अधिक सिलेंडरची गरज असल्यास ग्राहकाला प्रत्येक सिलेंडरसाठी ८८० रुपये द्यावे लागतात. 

जेटलीने सांगितले की, राजकीय नेतृत्व विशेषतः उच्चपदावर बसला असलेल्या व्यक्तीची निर्णय घेण्याची क्षमता असेल तर तो गुंतागुंतीचे निर्णय सहजतेने घेऊ शकतो. कोळसा ब्लॉक , स्पेक्ट्रम, नैसर्गिक साधन संपत्ती, डिझेल आणि गॅस दर या सारखे निर्णय घेतांना अनेक वर्ष वाट पाहण्याची गरज नाही. गेल्या काही वर्षात या संदर्भात निर्णय घेण्याची प्रक्रिया अवघट करून ठेवली होती. पण नवीन सरकार या संदर्भात निर्णय घेताना वेळ घालविणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

मला वाटते की या अजेंड्यावर आम्ही पुढे जात राहणार आहोत. भारत एक महत्त्वाच्या टप्प्यातून पुढे जात आहे. त्यावेळी आम्हांला धैर्य सोडायला नको. जगभरातील गुंतवणूकदार भारताकडे नव्या दृष्टीने पाहत आहे. सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने डिझेलच्य किंमती नियंत्रण मुक्त केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.