नवी दिल्ली : समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांचा शाही ढंगात सेलिब्रेट करण्यात आलेला वाढदिवस सोहळा सध्या खूपच चर्चेत आहे.
मुलायम २२ नोव्हेंबर रोजी आपल्या वयाची ७५ वर्ष पूर्ण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रामपूरमध्ये दोन दिवसांचा शाही सोहळा आयोजित करण्यासाठी प्रदेश सरकारचे शहरी विकास मंत्री आझम खान यांनी भव्य तयारी केलीय.
जन्मदिवसाच्या केल्या जाणाऱ्या तयारीबद्दल जेव्हा आझम खान यांना विचारण्यात आलं तेव्हा मात्र ते जबरदस्त भडकले... ते इतके भडकले की, मुलायम सिंह यांच्या जन्मदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तालिबान, दाऊद आणि अबू सालेमकडून फंड घेतल्याचं त्यांनी व्यंगात्मक पद्धतीत म्हटलं.
‘काही पैसा तालिबाननं दिलाय, काही दाऊदनं, काही अबू सालेमनं आणि काही इतर दहशतवादी संघटनांनी...’ असं त्यांनी म्हटलंय.
आझम खान नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. यापूर्वीही, ‘ताजमहालला वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित करून द्यायला हवं... आणि त्याची कमाई मुस्लिमांच्या विकासासासाठी खर्च केली जायला हवी’ या त्यांच्या वक्तव्यावर वादंग उठला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.