लोकसभा २०१९ : मोदींच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना निवडणूक लढणार

 'एनडीए'तील घटकपक्षांनी २०१९ सालची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्त्वाखाली लढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 11, 2017, 01:35 PM IST
लोकसभा  २०१९ : मोदींच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना निवडणूक लढणार title=

नवी दिल्ली : एनडीएची सोमवारी नवी दिल्लीत बैठक झाली, या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यावेळी 'एनडीए'तील घटकपक्षांनी २०१९ सालची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्त्वाखाली लढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

विशेष म्हणजे, भाजपच्या दुर्लक्षित वागणुकीमुळे नाराज असलेल्या शिवसेनेनेही या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तुर्तास तरी शिवसेनेने भाजपसंदर्भात मवाळ पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एनडीएच्या घटक पक्षांची बैठक सोमवारी नवी दिल्लीत आयोजित केली होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अरूण जेटली यांनी रालोआतील घटकपक्षांनी केलेल्या ठरावाबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. 

बैठकीत रामविलास पासवान यांनी भविष्यात रालोआचा विस्तार करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यासाठी २०१९ सालची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लढण्याचा ठराव 'एनडीए'तील घटकपक्षांनी एकमताने मंजूर केल्याचे जेटली यांनी यावेळी सांगितले.