नरेंद्र मोदींना झटका, याचिका फेटाळली

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मोठा झटका बसलाय. लोकायुक्त निवडीविरोधात गुजरात सरकारने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 2, 2013, 06:07 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मोठा झटका बसलाय. लोकायुक्त निवडीविरोधात गुजरात सरकारने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
यामुळे गुजरातमध्ये लोकायुक्त निवडीचा निर्णय योग्य असल्याचा निर्णय योग्य असल्याचे शिक्कामोर्तब झालेय.
लोकायुक्त निवडीचा निर्णय योग्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. गुजरातच्या राज्यपाल कमला बेनिवाल यांनी निवृत्त न्यायाधीश आर. ए. मेहता यांची लोकायुक्तपदी निवड केली होती. मात्र, गुजरात सरकारला विश्वासात न घेता राज्यपालांनी हा निर्णय घेतल्याचे सांगत लोकायुक्तांची निवड रद्द करण्यासाठी, गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दरम्यान, राज्यपालांनी मंत्रिमंडळाशी चर्चा न करता लोकायुक्तांची निवड केली, अशी टीका नियुक्तीवर मोदी यांनी राज्यपालांवर केली होती.

गुजरात सरकारची याचिका या आधी उच्च न्यायालयानेही फेटाळली होती. आता सर्वोच्च न्यायालयातही फेटाळण्यात आल्याने लोकायुक्त निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून गुजरातमध्ये लोकायुक्तांची जागा रिक्त होती. त्याठिकाणी ऑगस्ट २०११ मध्ये राज्यपालांनी आर. ए. मेहता यांची नियुक्ती केली होती.