#ChennaiFloods: १३७ वर्षात पहिल्यांदा छापले नाही ‘THE HINDU’ वर्तमानपत्र

 तामिळनाडूत झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात पूरजन्स परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे इंग्रजी वृत्तपत्र ‘THE HINDU’ १३७ वर्षात पहिल्यांदा छापला गेला नाही.

Updated: Dec 2, 2015, 03:07 PM IST
#ChennaiFloods: १३७ वर्षात पहिल्यांदा छापले नाही ‘THE HINDU’ वर्तमानपत्र  title=

चेन्नई  :  तामिळनाडूत झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात पूरजन्स परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे इंग्रजी वृत्तपत्र ‘THE HINDU’ १३७ वर्षात पहिल्यांदा छापला गेला नाही.

वर्तमानपत्राचे मालक एन. मुरली यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, चेन्नईमध्ये त्याचे कामगार ऑफिसपर्यंत नाही पोहचू शकले. त्यामुळे बुधवारी सिटी एडिशन छापण्यात आली नाही. 

मुरली यांनी सांगितले की, विमानसेवा आणि रेल्वे बंद आहे. वीज नाही. अशातच सिटी एडिशन छापणे शक्य नव्हते. वर्षातील काही सुट्ट्या सोडल्या तर असे पहिल्यांदा आहे की एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे अंकच छापला गेला नाही. 

- ज्या टाऊनशीपमध्ये वर्तमानपत्राचे कार्यालय आणि प्रिंटीग प्रेस आहे, त्या ठिकाणी जाणे खूप अवघड आहे. त्या ठिकाणी स्टाफ पोहचू शकला नाही. 

- आम्ही वर्तमानपत्र प्रसिद्ध केले असते तरी ते वितरीत करणे खूप अवघड होते. 
-इंग्रजीचे काही वर्तमानपत्र छापले पण ते कोणापर्यंत पोहचला नाही. 

तामिळनाडूतील स्थिती 

पावसाचा कहर अजून सुरू आहे. राजधानी चेन्नईमध्ये परिस्थिती अशी बिघडली की त्या ठिकाणी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि एनडीआरएफला मोर्चा सांभाळावा लागला. चेन्नई एअरपोर्ट बुधवारी दिवसभर बंद करण्यात आले. त्या ठिकाणी ४ हजार अडकले आहे. मंगळवारी चेन्नईमध्ये १४ तास २० सेंटीमीटर विक्रमी पाऊस झाला. हा गेल्या १०० वर्षातील सर्वाधिक पाऊस आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.