नवी दिल्ली : देशाच्या हवामानात जसा अचानक मोठा बदल झालाय, तसा काँग्रेसने आपल्या कार्यकारिणीत मोठा बदल केला आहे. मात्र या अचानक बदलाचे काय परिणाम होतील हे उशीरा का होईना दिसून येणार आहे. काँग्रेसला राजकीय हवामानात चांगले बदल करून पक्ष सदृढ करता येईल का ही देखिल महत्वाची बाब असणार आहे.
काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे, तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांची वर्णी लागली आहे.
माणिकराव ठाकरे यांच्या जागी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, तर गजानन चांदूरकर यांच्या जागी संजय निरूपम काम पाहणार आहेत.
दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाची अजय माकन यांची निवड करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.