कटरा हेलिकॉफ्टर दुर्घटनेतील मृत पायलट म्हणाली 'मी जिवंत आहे'

दोन दिवसांपूर्वी जम्मूच्या कटरामध्ये घटलेल्या हेलिकॉफ्टरची 'पायलट सुमिता विजयन' जिवंत आहे... असं खुद्द सुमितालाच जाहीर करावं लागलंय. 

Updated: Nov 25, 2015, 05:16 PM IST
कटरा हेलिकॉफ्टर दुर्घटनेतील मृत पायलट म्हणाली 'मी जिवंत आहे' title=

दुबई : दोन दिवसांपूर्वी जम्मूच्या कटरामध्ये घटलेल्या हेलिकॉफ्टरची 'पायलट सुमिता विजयन' जिवंत आहे... असं खुद्द सुमितालाच जाहीर करावं लागलंय. 

त्याचं झालं असं की, वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी कटरापासून सांझीपर्यंत जाणाऱ्या हेलिकॉफ्टरचा अपघात झाला... आणि यात पायलटसहीत काही भाविकांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर काही वृत्तपत्रांनी 'पायलट सुमिता विजयन' ही हेलिकॉफ्टर उडवत होती, असा दावा करत या घटनेत सुमिताचाही मृत्यू झाल्याच्या बातम्या तिच्या फोटोसहित दिल्या. हे फोटो सोशल वेबसाईटवरून घेण्यात आले होते.  

नुकताच सुमितानं एक दिल्ली दौरा केला होता... त्यामुळे, ही बातमी पाहून हादरलेल्या सगळ्या नातेवाईकांचे आणि मित्रांनी सुमिताला फोन लावले... त्यामुळे नातेवाईकांनाही  त्याच्याकडून ही गोष्ट समजल्यानंतर सुमिताला धक्काच बसला.  

यावर, ती खूपच आणि तिनं मीडियावर टीकाही केली. अशा बातम्या देताना मीडियानं तारतम्य बाळगावं... घाई करू नये असंही तिनं म्हटलंय.

यानंतर तिला आपल्या सोशल वेबसाईट अकाऊंटवरून आपण एकदम व्यवस्थित असल्याचं जाहीर करावं लागलं. 

सुमिता हिचा जन्म केरळचा आणि सध्या ती दुबईत राहते. गेल्या १५ वर्षांपासून ती दुबईतच स्थायिक झालेली आहे... आणि तिचा हेलिकॉफ्टर उड्डाणाशी काहीही संबंध नाही... सुमिता एक शिक्षिका आहे. 
 
   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.