डाळ, कांदे महाग झाले, गोमूत्र प्या, शेण खा

आपल्या वादग्रस्त प्रतिक्रियांनी नेहमी चर्चेत आणि वादात असलेले माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काट्जू यांनी आता महागाई आणि गोहत्येचा संबंध जोडून एक धक्कादायक विधान केले आहे. डाळी आणि कांद्याचे भाव भडकले आहेत. त्यामुळे लोकांनी गोमूत्र पिऊन आणि शेण खाऊन दिवस काढावेत,' असा सल्ला काट्जू यांनी दिला आहे.

Updated: Oct 20, 2015, 01:52 PM IST
डाळ, कांदे महाग झाले, गोमूत्र प्या, शेण खा title=

नवी दिल्ली : आपल्या वादग्रस्त प्रतिक्रियांनी नेहमी चर्चेत आणि वादात असलेले माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काट्जू यांनी आता महागाई आणि गोहत्येचा संबंध जोडून एक धक्कादायक विधान केले आहे. डाळी आणि कांद्याचे भाव भडकले आहेत. त्यामुळे लोकांनी गोमूत्र पिऊन आणि शेण खाऊन दिवस काढावेत,' असा सल्ला काट्जू यांनी दिला आहे.

काट्जू यांनी स्वत:च्या फेसबुकवर यासंदर्भातील पोस्ट टाकली असून गोमूत्र पिणाऱ्या आणि शेण खाणाऱ्या माणसाचे व्यंगचित्र पाठवण्याचं आवाहनही केलं आहे. 

'एका मूकपटात उपाशी चार्ली चाप्लीन स्वत:चे बूट खाताना दाखवला गेल्याची आठवण देत काट्जू म्हणतात, 'कुणी व्यंगचित्रकाराने एखाद्या व्यक्तीचे गोमूत्र पितानाचे आणि शेण खातानाचे चित्र काढून मला पाठवले तर मी ते चित्र माझ्या फेसबुक वॉलवर टाकेन.' असेही म्हटले आहे. 

त्याआधी काट्जू यांनी गोमांस बंदीवर एक पोस्ट टाकली होती. 'बंदी गोमांस खाण्यावर आहे, शेण खाण्यावर नाही. जर मी गायीचं शेण खाल्लं तर मला कुणी मारहाण करणार नाही अशी आशा आहे,' असे काट्जूंनी पोस्टमध्ये म्हटलं होतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.