१२ ते १५ वयाच्या मुलांमार्फत पंतप्रधानांवर हल्ल्याचा कट?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'इस्लामिक स्टेट' (ISIS) या संघटनेचे टार्गेट असल्याचा संशय आहे.

Updated: Jan 24, 2016, 08:00 PM IST
१२ ते १५ वयाच्या मुलांमार्फत पंतप्रधानांवर हल्ल्याचा कट? title=

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'इस्लामिक स्टेट' (ISIS) या संघटनेचे टार्गेट असल्याचा संशय आहे. १२ ते १५ वर्षांच्या मुलांचा वापर करुन २६ जानेवारीला मोदींवर हल्ला करण्याची इसिसची योजना असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केलीय.

गेल्यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या भाषणानंतर पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर शाळकरी विद्यार्थ्यांना भेटले होते. त्यामुळे यंदा दहशतवादी संघटना याचा फायदा घेऊ शकतात. 

यासाठी सर्वच ठिकाणी कडेकोड सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांनी मात्र हा दावा फेटाळला आहे.

१३ नोव्हेंबर २०१५ ला पॅरिसवर ISIS ने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रँकोईस होलांद भारतात प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी म्हणूनही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळेच हा धोका फार गंभीर असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.