'मी वाट पाहात आहे, खजुराहोतील मुर्तींना केव्हा साडी नेसवली जाते'

देशात असहिष्णुता एवढी वाढली आहे, की आता मी वाट पाहात आहे, सांस्कृतिक मंत्री खजुराहोतील नग्न मुर्तींना केव्हा साडी नेसवतात, असं नयनराता सहगल यांनी म्हटलं आहे.

Updated: Jan 24, 2016, 12:31 PM IST
'मी वाट पाहात आहे, खजुराहोतील मुर्तींना केव्हा साडी नेसवली जाते' title=

कोलकाता : देशात असहिष्णुता एवढी वाढली आहे, की आता मी वाट पाहात आहे, सांस्कृतिक मंत्री खजुराहोतील नग्न मुर्तींना केव्हा साडी नेसवतात, असं नयनराता सहगल यांनी म्हटलं आहे.

कोलकाता येथे आयोजित साहित्य उत्सवात सहगल म्हणाल्या, 'हिंदुत्वाला पुढे करत ज्या पद्धतीने देशात घटना घडत आहे, त्या पाहाता आता मी वाट पाहात आहे, की खजुराहोतील नग्न मुर्तींना सांस्कृतिक मंत्री केव्हा साड्या नेसवतात. कारण त्या फार नाट्यमय पद्धतीने संभोगाचे प्रदर्शन करत आहेत.'

देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्यावर सर्वात आधी पुरस्कार परत करणाऱ्यांपैकी नयनतारा सहगल एक आहेत. पुन्हा एकदा देशात असहिष्णुता वाढली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

सहगल म्हणाल्या, देशात असहिष्णुता एवढी वाढली आहे, की आता मी वाट पाहात आहे, सांस्कृतिक मंत्री खजुराहोतील नग्न मुर्तींना केव्हा साडी नेसवतात. त्यासोबतच मी पुरस्कार परत स्वीकारला असल्याचा वावड्या कशा उठल्या जातात.