श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्त्रो)कडून सोमवारी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या स्पेस शटल (RLV-TD)चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या यशस्वी प्रक्षेपणासोबतच इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय.
आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी सात वाजता या स्पेस शटलचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
शास्त्रज्ञांच्या मते रियुझेबल टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे अवकाशात पाठवण्यात येणाऱ्या पेलोडची किंमत 2000 डॉलर/किलो पर्यंत कमी होईल.
या मोहिमेसाठी गेल्या पाच वर्षांपासून ६०० शास्त्रज्ञ कार्यरत होते. या मोहिमेसाठी ९५ कोटी रुपये खर्च झाला.
आतापर्यंत रियुझेबल स्पेस शटल लाँच कऱणाऱ्या क्लबमध्ये अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि जपान या देशांचा समावेश होता. यात आता भारताचाही समावेश झालाय.