नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर सुरक्षेसंदर्भात झालेल्या कॅबिनेट कमिटीच्या बैठकीनंतर भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी भारतीय सेनेने पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात काल सर्जिकल ऑपरेशन केल्याची माहिती दिली.
रणबीर सिंग यांनी परिषदेत माहिती दिली की, आम्ही सर्जिकल ऑपरेशन करुन दहशतवाद्यांचे घुसखोरीचेच मनसुबे उधळून लावले. यादरम्यान अनेक दहशतवादी मारले गेले. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून टाकण्याचा आमचा उद्देश होता. आम्ही पाकिस्तानला या ऑपरेशनची माहिती दिली.
नियंत्रणरेषा ओलांडून भारतीय सैन्याचे पाकिस्तानला चोख उत्तर पाहा या हल्ल्याची वैशिष्ट्ये
१. पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याचा हल्ला
२. काल रात्री सैन्याने केले भारतीय नियंत्रण रेषेवर सर्जिकल स्ट्राईक ( अचूकपणे केलेली थेट लष्करी कारवाई)
३. सीमारेषेवर सैन्याने केले ५ दहशतवादी तळ उद्ध्वस्त, 2 सैनिक ठार तर ९ जखमी
४. पहिल्यांदाच भारतीय सैन्याने केला नियंत्रणरेषेबाहेरील तळावर हल्ला
५. उरी मधील दहशतवादी ह्ल्लायाविरोधात पाकिस्तानला प्रत्युत्तर
६. सर्जिकल स्ट्राईकच्याआधी अमेरिकेला घेतले विश्वासात
७. यावर्षी २० वेळा रोखली गेली घुसखोरी.
८. भारतीय सैन्य आता कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला तयार
९.दहशतवाद्यांनी दिली पाकिस्तान संबंधाची कबुली