चीन, पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी भारत घेणार एस-400 'ट्रायम्फ'

आपल्या एअरस्पेसची सुरक्षा वाढविण्यासाठी भारत लवकरच चीन आणि पाकिस्तानसमोर मोठं आव्हान निर्माण करणार आहे. भारत रशियाकडून नव्या जनरेशनचं एस-400 'ट्रायम्फ' एअर डिफेंस मिसाइल सिस्टम विकत घेण्याच्या तयारीत आहे.

Updated: Oct 15, 2015, 08:49 PM IST
चीन, पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी भारत घेणार एस-400 'ट्रायम्फ' title=

नवी दिल्ली: आपल्या एअरस्पेसची सुरक्षा वाढविण्यासाठी भारत लवकरच चीन आणि पाकिस्तानसमोर मोठं आव्हान निर्माण करणार आहे. भारत रशियाकडून नव्या जनरेशनचं एस-400 'ट्रायम्फ' एअर डिफेंस मिसाइल सिस्टम विकत घेण्याच्या तयारीत आहे.

हे मिसाइल सिस्टम 400 किलोमीटरपर्यंतच्या रेंजमध्ये येणाऱ्या शत्रूंच्या एअरक्राफ्ट, फायटर जेट्स, स्टील्थ प्लेन, मिसाइल आणि ड्रोनपर्यंतला पाडण्याची क्षमता ठेवतं. भारताची असे 12 मिसाइल विकत घेण्याची योजना आहे. चीननं एक वर्षापूर्वी असे सहा एस-400 मिसाइल सिस्टम विकत घेण्यासाठी रशियासोबत तीन बिलियन डॉलरची डील केली होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नुकताच भारतीय एअर फोर्सनं या डिफेंस सिस्टम विकत घेण्याचा प्रस्ताव मंत्रालयाला पाठवलाय. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरच्या नेतृत्वात डिफेंस एक्युजिशन काउंसिलनं या प्रस्तावावर काम सुरू केलंय. आगामी डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत ते पुतीनसोबत चर्चा करतील अशी आशा आहे.

काय आहे एस-400?

रशियाचं एस-400 डिफेंस सिस्टममध्ये विविध क्षमतेचे तीन पद्धतीचे मिसाइल आहेत. हे सुपरसोनिक आणि हायपरसोनिक मिसाइल 120-400 किलोमीटरच्या रेंजमध्ये कोणतंही टार्गेट पाडू शकतं. रशियन एक्सपर्टचा दावा आहे की, एस-400 मिसाइल सिस्टम जमीनपासून हवेत मारून रडारवर पकडण्यात न येणारे स्टील्थ मोड चे 5th जनरेशनचे फायटर जेट्स पण पाडू शकतं.

तर ट्रायम्फ प्रणालीबाबत बोलल्यास त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे जमीनीच्या आत असलेल्या ठिकाणांवरही ते मारा करतं. या प्रणालीनं तयार झालेले मिसाइल अंधारातही आपलं लक्ष्य अचूक गाठतात. भारतीय वायूदलात अशाप्रकारचं मिसाइल अद्याप नाहीय. 

पाहा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.