चंदीगड : (जयवंत पाटील, झी २४ तास, मुंबई) पंजाबमध्ये कापसावर पांढऱ्या तुडतुड्यांनी हल्ला केला आहे, यात शेतकऱ्यांचं २६ हजार कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे. किटकनाशकं बनावट असल्याच्या तक्रारीही पंजाबमध्ये येत आहेत, या धर्तीवर महाराष्ट्रातही किटकनाशक कंपन्यांची पडताळणी करणे गरजेचे झाले आहे.
पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची मालिकाच सुरू झाली आहे. हरियाणातही ४० टक्के उत्पन्न घटलं आहे. पंजाबमध्ये जवळ-जवळ कापूस पिक नष्ट झाल्यात जमा आहे.
पंजाबच्या कृषी मंत्र्यांनी किटकनाशक कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे, पांढरी माशी आणि तुडतुड्यांवर किटकनाशकं काहीही परिणाम का करत नाही, अशी ही विचारणा आहे.
शेतकऱ्यांशी संबंधित संघटना या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. कृषीशी संबंधित काही अधिकाऱ्यांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या आहेत. पंजाब सरकारने नुकसान भरपाई म्हणून आतापर्यंत ६०० कोटी रूपयांची घोषणा केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.