मुलाच्या लग्नात १८ हजार विधवांना निमंत्रण

ॉ तब्बल १८ हजार विधवा महिलांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रण दिले.

Updated: Jan 31, 2016, 09:37 PM IST
मुलाच्या लग्नात १८ हजार विधवांना निमंत्रण title=

अहमदाबाद : गुजरातमधील एका व्यापाऱ्याने आपल्या मुलाच्या विवाहात नवदांपत्यांना आशीर्वाद देण्यासाठी तब्बल १८ हजार विधवा महिलांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रण दिले होते.  भारतामध्ये आजही शुभकार्यात विधवा महिलांची उपस्थिती अशुभ मानली जाते. मात्र ही वाईट परंपरा मोडून काढण्यासाठी ही निमंत्रण पाठण्यात आली होती.

'ज्या समाजाने या विधना महिलांना दुर्लक्षित केले आहे त्यांच्याकडून या नवविवाहितांना आशीर्वाद मिळावेत अशी माझी इच्छा होती. अशा शुभप्रसंगी विधवा महिलांची उपस्थिती अशुभ मानली जाते. मात्र हा समज म्हणजे केवळ अंधश्रद्धा असून दुसरे काहीही नसल्याचे मला सिद्ध करायचे होते', अशा प्रतिक्रिया जीतूभाई पटेल यांनी व्यक्त केल्या आहेत. 

उपस्थित सर्व महिलांना एक घोंगडे आणि एक रोप भेट म्हणून देण्यात आले. याशिवाय या महिला स्वावलंबी बनाव्यात यासाठी त्यांना एक दुभती गायही भेट देण्यात आली. 'आता मी एक चांगले आयुष्य जगू शकेल, कारण माझ्याकडे गाय आहे. मी कधीही विचार केला नव्हता की एका विधवेलाही समाजात एवढा मोठा सन्मान मिळू शकेल', अशी प्रतिक्रिया मेहसाना जिल्ह्यातून आलेल्या एका महिलेने व्यक्त केली.

गुजरातमधील प्रतिष्ठित व्यापारी जीतूभाई पटेल यांना विधवांना देण्यात येणाऱ्या वाईट वागणुकीची कुप्रथा मोडीत काढायची होती. त्यासाठी त्यांनी पुत्र रवीच्या विवाहात उपस्थित राहून आशीर्वाद देण्यासाठी १८ हजार महिलांना निमंत्रित केले होते. त्यासाठी गुजरातमधील बनासकाठा, मेहसाना, साबरकाठा, पाटन आणि अरावली जिल्ह्यातून महिलांना निमंत्रण करण्यात आले.