फेसबुकवर तरूणीचा अश्लील फोटो केला अपलोड

पश्चिम बंगालमध्ये कोलकाता पोलिसांनी सोशल नेटवर्किंग साईटवर एका तरूणीचा अश्लील फोटो अपलोड केल्याप्रकरणी त्रिपुरामधील एका तरूणाला अटक केली आहे.

Updated: Jun 28, 2015, 07:18 PM IST
फेसबुकवर तरूणीचा अश्लील फोटो केला अपलोड title=

आगरतळा : पश्चिम बंगालमध्ये कोलकाता पोलिसांनी सोशल नेटवर्किंग साईटवर एका तरूणीचा अश्लील फोटो अपलोड केल्याप्रकरणी त्रिपुरामधील एका तरूणाला अटक केली आहे.

त्रिपुरामधील खोवाई गावातील अरूप देव या तरूणाने पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील एका तरूणीचा अश्लील फोटो फेसबुकवर टाकला होता. पिडीत तरूणीच्या नातेवाईकांनी कलम 67 अंतर्गत  पोलिसात गुन्हा दाखल केला असून या तरूणीशी त्याची मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये ओळख झाली होती.

या तरूणाने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता पण तिने तो नाकारला होता. या प्रकारानंतर त्याने तिचे अश्लील फोटो फेसबुकवर टाकले होते. आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.