कोलकाता: मंत्र्यांकडून सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांकडून आपले खाजगी काम करून घेण्याच्या बातम्या आपण अनेकदा पाहिल्या आहेत. पश्चिम बंगालमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय.
पश्चिम बंगालच्या एक मंत्र्यांनं चक्क पोलीसाकडून आपल्या बुटाची लेस बांधून घेतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री रछपाल सिंह यांनी हा प्रताप केलाय. प्रसिद्ध पेंटर सामकिंकर बैज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला गेले असता मंत्रिमहोदयांनी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाकडून आपल्या बुटाची लेस बांधून घेतली... नेमके हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आणि ही घटना पुढे आली.
याबाबत इंग्रजी वृत्तपत्र डीएनएनं रछपाल सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. आता मंत्रिमहोदयांनी फक्त लेस बांधून घेतली की, जोडे पण पोलिसाकडून घालून घेतले हे मात्र कळलं नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.