'गाय आणि बकरीच्या मांसात तोच फरक आहे जो पत्नी आणि बहिणीमध्ये'

धार्मिक मुद्यांवर बोलताना बिहारच्या नेत्यांची पातळी घसरताना दिसतेय. गिरीराज सिंह यांनी लालूंवर टीका करताना गाय आणि बकरीच्या मांसाची तुलना 'पत्नी' आणि 'बहिणी'सोबत केलीय. 

Updated: Oct 10, 2015, 02:23 PM IST
'गाय आणि बकरीच्या मांसात तोच फरक आहे जो पत्नी आणि बहिणीमध्ये' title=

पाटणा : धार्मिक मुद्यांवर बोलताना बिहारच्या नेत्यांची पातळी घसरताना दिसतेय. गिरीराज सिंह यांनी लालूंवर टीका करताना गाय आणि बकरीच्या मांसाची तुलना 'पत्नी' आणि 'बहिणी'सोबत केलीय. 

बिहारच्या नवादामध्ये गिरीराज सिंह बोलत होते. आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना गाय आणि बकरीच्या मांसामधला फरक त्यांनी समजावून सांगितलाय. 'बकरी आणि गायच्या मांसाबद्दल आमची भावना आणि धर्म त्याच पद्धतीत आहे ज्याप्रमाणे बहिण आणि पत्नी... दोन्हीही पूजनीय आहेत. पण, दोघांचा भावनात्मक संबंध वेगवेगळा आहे. लालू प्रसाद काय गंमत करत आहेत. म्हणतायत की जो बकरीचं मांस खातो गायीचंही मांस खातो...' असं वक्तव्य गिरीराज सिंह यांनी केलंय. 

'मांस हे मांस असतं... ते गायीचं असो किंवा बकरीचं... त्यानं काय फरक पडतो' असं वक्तव्य लालू प्रसाद यादव यांनी केलं होतं. यावर गिरीराज सिंह त्यांना प्रत्यूत्तर देत होते.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.