गूगल सर्चमध्ये गोवा हॉट डेस्टिनेशन

देशातल्या पर्यटकांमध्ये 2016 या वर्षात गोवा हे सर्वात हॉट डेस्टिनेशन ठरलं आहे.

Updated: Dec 16, 2016, 07:52 PM IST
गूगल सर्चमध्ये गोवा हॉट डेस्टिनेशन title=

मुंबई : देशातल्या पर्यटकांमध्ये 2016 या वर्षात गोवा हे सर्वात हॉट डेस्टिनेशन ठरलं आहे. गुगलनं देशातल्या पर्यटनस्थळांबाबत झालेल्या सर्चचा डेटा प्रसिद्ध केला आहे. यात भारतातल्या पर्यटकांची गोव्याला पसंती मिळालीये. देशातल्या हिल स्टेशन्समध्ये सिमल्याला सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

परदेशात पर्यटनासाठी जाणाऱ्या भारतीय प्रवाशांनी पॅरिसची सर्वाधिक निवड केल्याचं गुगलच्या अहवालात म्हटलंय. गोव्यानंतर पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळालीये ती मोठ्या शहरांना. दुसऱ्या क्रमांकावर आहे आमची मुंबई तर त्याखालोखाल चेन्नई आणि बंगळुरूसाठी सर्वाधिक सर्च झालाय. आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये पॅरीसखालोखाल केपटाऊन, लंडन, रोम आणि बँकॉकला पसंती मिळाली आहे.