अठराव्या वर्षीच मुली लग्नासाठी कशा सज्ञान होऊ शकतात? - हायकोर्ट

मद्रास हायकोर्टानं मुलींच्या लग्नसाठी असणारी कमीत कमी 18 वर्षांच्या वयोमर्यादेवर पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिलाय. 

Updated: Oct 9, 2014, 04:16 PM IST
अठराव्या वर्षीच मुली लग्नासाठी कशा सज्ञान होऊ शकतात? - हायकोर्ट title=

मदुराई : मद्रास हायकोर्टानं मुलींच्या लग्नसाठी असणारी कमीत कमी 18 वर्षांच्या वयोमर्यादेवर पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिलाय. 

न्यायमूर्ती एस. मणिकुमार आणि व्ही. एस. रवि यांच्या खंडपीठाच्या म्हणण्यानुसार, लग्नासाठी मुलांना 21 वर्षांची वयोमर्यादा तर मुलींसाठी हीच मर्यादा 18 वर्षांची आहे. पण, मुलं आणि मुली दोघंही वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत शाळेतच असतात. अशावेळी, 18 व्या वर्षींच मुली सज्ञान होतात, असं कसं म्हटलं जाऊ शकतं असा सवालच खंडपीठानं उपस्थित केलाय. 

गेल्या काही वर्षांपासून कमी वयांतील मुलींच्या लग्नाची अनेक प्रकरणं समोर आल्यानंतर कोर्टानं वयोमर्यादेवर पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिलाय. 

‘बालविवाह प्रतिबंध कायद्या’त संशोधन करण्यासाठी सूचना आल्यावर मुलींच्या लग्नासाठी वयोमर्यादा वाढवण्यावर विचार केला जाऊ शकतो.

महत्त्वाचं म्हणजे, हिंदू कायद्यानुसार, वयाची 21 वर्ष ओलाडल्यानंतर मुलांना लग्नायोग्य मानलं जातं. मुलगी अठराव्या वर्षीच लग्नासाठी सामाजिक आणि मानसिक स्तरावर कशी काय सज्ञान होऊ शकते, असं सांगत कोर्टानं याबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय. 

आर. थियागराजन यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं हा सल्ला दिलाय. या याचिकेनुसार, कायद्यानं निर्धारित केलेल्या वयांत मुलं मानसिक रुपात लग्नाचा योग्य निर्णय घेण्याची योग्यता निर्माण होत नाही.
 
पालक आपल्या मुलांना मोठ्या प्रेमानं-लाडानं वाढवतात, त्यांना शिकवातात आणि त्यांच्यासाठी जीवनसाथीही शोधतात, असंही यावेळी कोर्टानं म्हटलंय. त्यामुळेच मुलींसाठी लग्नाची वयोमर्यादा वाढवण्यावर कोर्टानं जोर दिलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.