नवी दिल्ली: सीमेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरुच आहेत. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. भारतानं पाकिस्तानच्या या कारवायांची गंभीर दखल घेतली असून पाकिस्तान कडून असेच हल्ले होत राहिल्यास त्याची गंभीर किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल असा इशारा संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला दिलाय.
भारताच्या सुरक्षेसाठी आम्ही आवश्यक उपाययोजना राबवत आहोत, भारत पाकला चोख प्रत्युत्तर देईल. चर्चा करायची असेल तर पाकनं गोळीबार बंद करावा, असं जेटलींनी म्हटलंय. तर भारतीय सैन्य काय प्रत्युत्तर देत आहे हे विरोधकांनी समजून घ्यावं, मगच टीका करावी, असंही ते म्हणाले.
दरम्यान, पाकिस्तानविषयी पंतप्रधानांनी बोलण्याची काहीच गरज नसून भारताचे जवान त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत, असं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलंय.
कालही रात्रभर पाक सैन्याकडूनं ६० चौक्यांना टार्गेट करत फायरिंग करण्यात आली. जम्मू, सांबा, कथुआमधल्या ८० गावांना या फायरिंगचा फटका बसलाय. आतापर्यंत यात किमान ३ जण जखमी झालेत. या फायरिंगला भारतानं जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.