सिलिंडर सबसिडी ऑक्टोबरपासून बॅँकेत जमा

एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी एक ऑक्टोबरपासून थेट बॅँक खात्यात जमा होणार आहे. आधार कार्डाच्या साह्यानं ही रक्कम ग्राहकांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 28, 2013, 02:01 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली
एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी एक ऑक्टोबरपासून थेट बॅँक खात्यात जमा होणार आहे. आधार कार्डाच्या साह्यानं ही रक्कम ग्राहकांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.
केंद्र सरकारमधील सूत्रांनी ही माहिती दिलीय. सध्या प्रत्येक ग्राहकाला दरवर्षी ९ सिलिंडर सवलीतच्या दरात देण्यात येतात. यासाठी दर ग्राहकामागे ४ हजारांचा बोजा केंद्र सरकारला सहन करावा लागतो. ही रक्कम थेट बॅँकेत हस्तांरित करण्याची पायलट योजना १५ मे पासून सुरु आहे.

देशातल्या २० जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरु आहे. देशभरात एलपीजी सिलिंडर्सचे १४ कोटी ग्राहक आहेत. त्यापैकी केवळ ८० लाख ग्राहकांचे बॅँक अकाऊंटस आधार कार्डशी संलग्न आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरपर्यंत १३ कोटींपेक्षा जास्त ग्राहकांचे बॅँक अकाऊंट्स आधार कार्डशी जोडण्याचं आव्हान सरकारपुढे असणार आहे.