मित्राने तिचा अश्लील व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत पैसे उकळले

दिल्लीत एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. मित्रानेच महिलेवर बलात्कार करुन एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओच्या माध्यमातून तो तिला ब्लॅकमेल करुन तिच्याकडून पैसेही उकळावयाचा. याप्रकरणी मोहम्मद नावेद (३६) याला पोलिसांनी अटक केली.

Updated: Sep 5, 2015, 09:58 PM IST
मित्राने तिचा अश्लील व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत पैसे उकळले title=

नवी दिल्ली : दिल्लीत एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. मित्रानेच महिलेवर बलात्कार करुन एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओच्या माध्यमातून तो तिला ब्लॅकमेल करुन तिच्याकडून पैसेही उकळावयाचा. याप्रकरणी मोहम्मद नावेद (३६) याला पोलिसांनी अटक केली.

नावेदची पीडित महिलेबरोबर एका मोबाईल दुकानात फेब्रुवारीमध्ये ओळख झाली. हे दोघ चांदनी महल परिसरातील आहेत. ओळखीतून त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. त्यांचा संपर्क सुरु होता. या महिलेच्या वाढदिवसानिमित्ताने नावेदने तिला जेवणासाठी बोलावले. त्यावेळी त्याने लॉजवर नेत तिला शिकार बनवत तिच्यावर रेप केला. दरम्यान, याचा व्हिडिओ तयार केला.

त्यानंतर नावेदने हा व्हिडिओ इंटनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली. त्यानंतर तो तिच्यावर सातत्याने बलात्कार करत राहिला. त्याची भूक अधिक वाढत गेली आणि तो तिच्याकडे पैशाची मागणी करु लागला. त्यानंतर त्यांने आपल्या मित्रासोबत संबंध ठेवण्यासाठी सांगू लागला. त्यानंतर पीडित महिलेने पोलिसांनी संपर्क साधून त्याचा भांडाफोड केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.