गोव्यात ख्रिसमसची लगबग, पर्यटकांसाठी हॉटेल्स सज्ज

ख्रिसमस अगदी दोन दिवसांवर आलाय. गोव्य़ात ख्रिसमसची लगबग सुरू आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. तर पर्यटकांसाठी हॉटेल्स सज्ज झालीयेत.

Updated: Dec 22, 2014, 07:44 AM IST
गोव्यात ख्रिसमसची लगबग, पर्यटकांसाठी हॉटेल्स सज्ज title=

पणजी : ख्रिसमस अगदी दोन दिवसांवर आलाय. गोव्य़ात ख्रिसमसची लगबग सुरू आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. तर पर्यटकांसाठी हॉटेल्स सज्ज झालीयेत.

झिंगल बेलचे सूर हवेत रूळायला लागले.. हवेत सुखद गारवा पसरला की वेध लागतात ख्रिसमसचे.. गोव्यात ख्रिसमसची धूम काही औरच असते.. गोवेकरांच्या या लाडक्या उत्सवाला दोनच दिवस बाकी आहेत. त्यामुळे एरवी सुशेगात असलेल्या गोव्याच्या आयुष्याला आता वेग आलाय.

गोव्यात ख्रिसमसच्या तयारीची झुंबड उडालीय. विविध प्रकारचे स्ट्रीमर्स, रिंग्ज, वेल, बेल्ट, स्टार, ड्रम्स, क्रीप्स, मेटालिक बॉल्स आणि सजावटीच्या अनेक वस्तूंनी बाजारपेठा फुलल्या आहेत.

कॅरोलच्या सुरांची रंगत आणि बाजारपेठांचा झगमगाट यामुळे वातावरणात प्रचंड उत्साह आहे. त्याला साथ मिळत्ये मस्त थंड हवेची.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.