मावळला सरत्या वर्षांचा सूर्य…!

सरत्या वर्षाचा म्हणजेच साल 2014 चा सूर्य आता मावळलाय. 2014 या वर्षातल्या अखेरच्या सूर्यास्ताचं दर्शन घेण्यासाठी मुंबईत मरीन ड्राईव्हसह गिरगाव चौपाटीवर पर्यटकांनी एकच गर्दी केलेली दिसली.  

Updated: Dec 31, 2014, 07:19 PM IST
मावळला सरत्या वर्षांचा सूर्य…! title=

मुंबई : सरत्या वर्षाचा म्हणजेच साल 2014 चा सूर्य आता मावळलाय. 2014 या वर्षातल्या अखेरच्या सूर्यास्ताचं दर्शन घेण्यासाठी मुंबईत मरीन ड्राईव्हसह गिरगाव चौपाटीवर पर्यटकांनी एकच गर्दी केलेली दिसली.  

आज 31 डिसेंबर... अर्थातच तरुण उत्साही मंडळींनी थर्टी फर्स्ट या वर्षाचा शेवटचा दिवशी 2014 ला निरोप देण्यासाठी आणि 2015 च्या स्वागताची जंगी तयारी केलीय.

याच निमित्तानं अवघी मुंबई सज्ज झालीय. सर्व जण जल्लोषाच्या मूडमध्ये असले तरी अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुंबई पोलिसांचा खडा पहारा मुंबईभर आहे. ‘गेट वे ऑफ इंडिया’ इथंही नविन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर गर्दी करतायत. त्यामुळं इथंही सुरक्षाव्यवस्था करण्यात आलीय.

सरत्या वर्षातले हेवेदावे बाजुला ठेवून सर्वजण पार्टीमध्ये रंगण्यासाठी सिद्ध झालेत. मुंबई-पुण्यासह वाईननगरी नाशिकमध्ये या पार्ट्यांची जोरदार तयारी सुरू आहे. पर्यटकांचं खास आकर्षण असलेल्या गोव्यामध्ये तर इयरएंडचा माहौल काही औरच असतो... 

चला... नववर्षाचा जल्लोष करण्यासाठी आपणही सज्ज होऊया...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.