मोदी सरकारच्या मदतीला अमिताभ बच्चन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीला अभिनेता अमिताभ बच्चन धावून आलाय. जातीयवादापेक्षा विकास महत्त्वाचा असा संदेश बिग बी मोदी सरकारच्या जाहिरातीतून देणार आहेत.

Updated: Dec 31, 2014, 06:27 PM IST
मोदी सरकारच्या मदतीला अमिताभ बच्चन title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीला अभिनेता अमिताभ बच्चन धावून आलाय. जातीयवादापेक्षा विकास महत्त्वाचा असा संदेश बिग बी मोदी सरकारच्या जाहिरातीतून देणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य हिंदूत्ववादी संघटनांनी धर्मांतराची मोहीम सुरु ठेवल्याने गोत्यात आलेल्या मोदी सरकारच्या मदतीला बिग बी आले आहेत.

हिंदूत्ववादी संघटनांनी देशभरात घर वापसीची मोहीम राबवली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी धर्मांतरावरुन मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली होती.

हिंदूत्ववादी नेत्यांच्या भडक भाषणामुळे मोदी सरकारची डोकेदुखी वाढवली होती. घर वापसीमुळे मुस्लिम, ख्रिश्चन या अल्पसंख्यांक समाजामध्ये मोदी सरकारविरोधात नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे विकासाऐवजी जातीयवादामुळे केंद्र सरकार जास्त चर्चेत राहिले. भविष्यात याचा फटका बसू नये आणि अल्पसंख्यांक समाजाचा विश्वास संपादन करता यावा यासाठी नरेंद्र मोदी सरसावल्याचे दिसत आहेत.

मोदींनी अमिताभ बच्चन यांची मदत घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. अमिताभ बच्चन केंद्र सरकारसाठी एक जाहिरात करणार असून या जाहिरातीमध्ये जात आणि धर्मापेक्षा विकास महत्त्वाचा आहे, असा संदेश दिला जाणार आहे. ही जाहिरात प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर सर्वत्र झळकेल यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे प्रयत्न सुरु आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.