एस्सेल ग्रूपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या आत्मचरित्राचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

एस्सेल ग्रूपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या ' द झेड फॅक्टर :  माय जर्नी अॅज द रॉग मॅन अॅट राइट टाइम' आत्मचरित्राचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झालंय

Updated: Jan 21, 2016, 12:12 AM IST

नवी दिल्ली :  एस्सेल ग्रूपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या ' द झेड फॅक्टर :  माय जर्नी अॅज द रॉग मॅन अॅट राइट टाइम' आत्मचरित्राचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झालंय. हे पुस्तक सुभाष चंद्रा यांच्यासह प्रांजल शर्मा यांनी लिहिले आहे.

यावेळी राजकारण, समाजकारण, सिने-जगत, उद्योग जगतातील काही निवडक व्यक्ती उपस्थित होत्या. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव, अमर सिंग, सुशील कुमार शिंदे, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग,  अभिनेते अनुपम खेर, अक्षय कुमार उपस्थित होते. 

तसेच या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा झी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये उद्या दुपारी १२.२५ वाजता होणार आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार एम. जे. अकबर आणि वल्लभ भंसाळी हे डॉ. सुभाष चंद्रा यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. 

या पुस्तकाचे प्रकाशन हार्पर क़लिंन्स यांनी केले असून उद्या पासून देशभरा सर्व बुक स्टॉलवर उपलब्ध होणार आहे. तसेच या पुस्तकाची फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन इंडियावर प्री-बुकिंग सुरू आहे.

या पुस्तकाचे प्रोमो, कार्यक्रमाचे अपडेट आणि तज्ञ्जांचे मत ट्विटर आणि फेसबूकववर उपलब्ध आहेत. 

भारतात टेलिव्हिजन क्रांती घडवून आणल्यामुळे  डॉ. सुभाष चंद्रा यांना भारतातील मीडिया मुगल म्हणून ओळखले जाते.  १९९२ मध्ये भारतात पहिले सॅटेलाइट हिंदी टीव्ही चॅनल झी टीव्ही भारतात आणले. त्यानंतर पहिले खासगी न्यूज चॅनल झी न्यूज प्रथम भारतात सुरू करण्याचे श्रेय डॉ. सुभाष चंद्रा यांन जाते. 

डॉ. सुभाष चंद्रा यांच्या कार्याची पताका विविध क्षेत्रात फडकत आहे. टेलिव्हिजन नेटवर्क (झी), वर्तमानपत्र (DNA), केबल सिस्टिम (Wire and Wireless Ltd), डायरेक्ट टू होम ( डिश टीव्ही), सॅटेलाइट कम्युनिकेशन (अग्रणी आणि प्रो कॉल), थीम पार्क (एस्सेल वर्ल्ड आणि वॉटर किंग्डम), ऑनलाइन गेमिंग (प्लेविन), शिक्षण (झी लर्न), प्लेक्झीबल पॅकेजिंग (एस्सेल प्रोपॅक) , मूलभूत सेवा सुविधा ( एस्सेल एन्फ्रो प्रोजक्ट लिमिटेड) आणि फॅमिली एन्टरटेन्मेंट सेंटर (फन सिनेमाज्) या क्षेत्रांचा समावेश होतो. 

एक समाजसेवक म्हणून  डॉ. सुभाष चंद्रा यांनी आपली देशाप्रति कर्तव्य बजावण्याचा सदैव प्रयत् केल आह. त्यांनी तालीम (TALEEM) (Transnational Alternate Learning for Emancipation and Empowerment through Multimedia) संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून दर्जदार आणि दूरस्थ शिक्षण देण्याची सुरूवात केली. 


डॉ. चंद्रा हे एकल विद्यालय फाउंडेशन ऑफ इंडियाचेही चेअरमन आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागात साक्षरता मोहिम सुरू करण्यात सिंहाचा वाटा या संस्थेने घेतला. या फाउंडेशनच्या माध्यमातून देशातील २७ हजार खेड्यातीील आठ लाख विद्यार्थ्यांना एक शिक्षक शाळेच्या माध्यमातून मोफत शिक्षण दिले जात आहे.