बनावट पासपोर्ट मिळवा... केवळ दोन लाखांत!

नवी दिल्ली : दहशतवाद आणि सुरक्षेच्या विविध समस्या असलेल्या आपल्या देशात आता पासपोर्टही विकत मिळतोय, असा दावा केलाय 'इंडिया टुडे ग्रुप'च्या एका इंव्हेस्टिगेशन टीमनं... 

Updated: Jan 20, 2016, 12:55 PM IST
बनावट पासपोर्ट मिळवा... केवळ दोन लाखांत! title=
नवी दिल्ली : दहशतवाद आणि सुरक्षेच्या विविध समस्या असलेल्या आपल्या देशात आता पासपोर्टही विकत मिळतोय, असा दावा केलाय 'इंडिया टुडे ग्रुप'च्या एका इंव्हेस्टिगेशन टीमनं... 
 
हा दावा खरा असेल तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही खूपच गंभीर बाब आहे. या ग्रुपच्या म्हणण्यानुसार नेपाळ, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना हे पासपोर्ट देण्यात आले आहेत.
 
'इंडिया टुडे ग्रुप'नं केलेल्या दाव्यानुसार, हुमायुपूर गावात २०१५ साली 'के-७७, हुमायुपूर गाव' या पत्त्यावर तीन पासपोर्ट देण्यात आले आहेत. पारू शर्मा, मनीषा दुबे आणि बरखा यादव या तीन जणांना पासपोर्ट देण्यात आले आहेत. पण, प्रत्यक्ष या पत्त्यावर अशी कोणतीही व्यक्ती राहत नाही. नेपाळच्या तीन जणांना हे पासपोर्ट दिले गेले आहेत, असा संशय आहे.
 
या टीमचा असाही दावा आहे की, काही पासपोर्टस् तर चक्क रिकाम्या भूखंडांच्या पत्त्यांवर जारी केले गेले आहेत. दिल्ली प्रभागीय कार्यालयातून हे पासपोर्टस् दिले गेले आहेत. अफगाणी नागरिकांना हे पासपोर्ट दिले गेल्याचा संशय आहे.


या पासपोर्टस्साठी २ ते ६ लाख रुपये इतकी रक्कम मोजली जाते. परदेशी नागरिकांकडून ६ लाख रुपये घेतले जातात असा दावा या टीमनं केलाय... तर पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या मते ही काही नवीन बाब नसून अशी रॅकेट्स याआधीही उघड झाली आहेत.