जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ जवान शहीद

जम्मू काश्मीरच्या कुलगाममधील यारीपोरा भागात २ भारतीय जवान शहीद तर एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. या ठिकाणी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सकाळी सात वाजल्यापासून चकमक सुरु आहे. या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे.

Updated: Feb 12, 2017, 01:44 PM IST
जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ जवान शहीद title=

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या कुलगाममधील यारीपोरा भागात २ भारतीय जवान शहीद तर एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. या ठिकाणी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सकाळी सात वाजल्यापासून चकमक सुरु आहे. या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे.

मृत दहशतवाद्यांकडून 4 एके-47 जप्त करण्यात आल्यात. यातील दोन दहशतवादी हिजबूल मुजाहिदीन तर दुसरे दोन हे लष्कर ए तोयबाचे खतरनाक दहशतवादी होते. या चकमकीत 3 दहशतवादी जखमी झाले असून त्यांचा शोध सुरु आहे. या वर्षातील ही सगळ्यात मोठी चकमक होती ज्यात आपले 2 जवान शहीद झाले आहेत. चकमक आता थांबली असली तरी अजुनही सर्च ऑपरेशन सुरू आहे.