'मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवू नये'

पालकांनी आपल्या मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवू नये, असा सल्ला गोव्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांच्या पत्नी लता यांनी दिला आहे.

Updated: Apr 6, 2015, 07:37 PM IST
'मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवू नये' title=

पणजी : पालकांनी आपल्या मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवू नये, असा सल्ला गोव्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांच्या पत्नी लता यांनी दिला आहे.

इंग्रजी शाळेत विद्यार्थी पश्चिमेकडील संस्कृती अवलंबितात आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होते. त्यामुळे मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवू नका, असा सल्ला गोव्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांच्या पत्नी लता यांनी दिला आहे.

या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मंत्री दीपक ढवळीकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ढवळीकर हे भाजपच्या नेतृत्वाखालील गोवा सरकारच्या मंत्रिमंडळात फॅक्टरीज व ब्रॉयलर्स मंत्री आहेत. 

काय म्हणाल्या मिसेस ढवळीकर?
ढवळीकर यांच्या पत्नी उजव्या विचारसरणीच्या सनातन संस्थेचे काम करतात. रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात पालकांना सल्ला देताना त्या म्हणाल्या, "हिंदू पुरूषाने घराबाहेर पडताना नाम ओढायला पाहिजे, तर महिलेने कुंकू लावले पाहिजे. एक जानेवारीऐवजी हिंदू नववर्षाला म्हणजे गुढी पाडव्याला नववर्ष साजरे केले पाहिजे. फोनवरूनही आपण सर्वप्रथम हॅलो न म्हणता नमस्कार म्हटले पाहिजे. 

आपण आपल्या भारतीय संस्कृतीवर गर्व केला पाहिजे. सध्या भारतीय कुंकू न लावता साडी न घालता, अंगाबरोबर कपडे घालतात. त्यामुळेच बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पश्चिमेकडील संस्कृतीच्या अनुकरणामुळेच हे सर्व झाले आहे.'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.