खोक्यांमध्ये निर्वस्त्र अवस्थेत सापडला तरुण-तरुणीचा मृतदेह

हरियाणाच्या सोनीपतमध्ये दोन वेगवेगळ्या लाकडाच्या खोक्यांमध्ये एका तरुणाचा आणि एका तरुणीचे मृतदेह सापडलेत.

Updated: Apr 6, 2015, 07:37 PM IST
खोक्यांमध्ये निर्वस्त्र अवस्थेत सापडला तरुण-तरुणीचा मृतदेह title=

नवी दिल्ली : हरियाणाच्या सोनीपतमध्ये दोन वेगवेगळ्या लाकडाच्या खोक्यांमध्ये एका तरुणाचा आणि एका तरुणीचे मृतदेह सापडलेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचीही गळा दाबून हत्या करण्यात आलीय. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटलेली नाही. 

नॅशनल हायवेवर देवीलाल पार्कजवळ दोन वेगवेगळ्या बॉक्समध्ये तरुण-तरुणीचा मृतदेह सापडलाय. हे दोन्हीही मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत होते. मुलीच्या हातात चुडा भरलेलाही आढळलाय. तरुण आणि तरुणीचे पायही कापलेल्या अवस्थेत आढळलेत. 

हे हॉरर किलिंगचं प्रकरण आहे का? याचा पोलीस शोध घेत आहे. हरियाणा पोलिसांनी या प्रकरणाचा गुंता सोडवण्यासाठी दिल्ली आणि यूपीच्या पोलिसांशी संपर्क साधलाय. 
 
या युगुलाची हत्या करून त्यांचे मृतदेह इथं आणून टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.