अखेर, जेएनयूच्या कन्हैया कुमारला जामीन मंजूर

देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारला अखेर जामीन मिळालाय. 

Updated: Mar 2, 2016, 10:11 PM IST
अखेर, जेएनयूच्या कन्हैया कुमारला जामीन मंजूर title=

नवी दिल्ली : देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारला अखेर जामीन मिळालाय. 

दिल्ली हायकोर्टानं कन्हैयाला सहा महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केलाय. कन्हैयाला १० हजारांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आलाय.

पोलिसांना वेळोवेळी तपासात सहकार्य करण्याचे निर्देश कोर्टानं कन्हैयाला दिले आहेत. नऊ फैब्रुवारीला जेएनयूच्या परिसरात अफजल गुरूच्या समर्थनात कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात  देशविरोधात घोषणा दिल्याचा आरोप कन्हैयावर आहे.

याप्रकरणी कन्हैयाला १२ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. मात्र कन्हैयानं या आरोपांचा इन्कार केलाय. गेल्या तीन आठवड्यांपासून कन्हैया अटकेत होता.