पोलिसांना पाठवत होता पॉर्न व्हिडिओ

 दिल्ली पोलिसांना व्हॉट्स अॅपवर पॉर्न व्हिडिओ पाठविणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलीआहे. भ्रष्टाचाराविरोधात सुरू करण्यात आलेल्या नंबरवर हे पॉर्न व्हिडिओ पाठविण्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. 

Updated: Aug 21, 2014, 05:59 PM IST
पोलिसांना पाठवत होता पॉर्न व्हिडिओ title=

नवी दिल्ली:  दिल्ली पोलिसांना व्हॉट्स अॅपवर पॉर्न व्हिडिओ पाठविणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलीआहे. भ्रष्टाचाराविरोधात सुरू करण्यात आलेल्या नंबरवर हे पॉर्न व्हिडिओ पाठविण्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. 

९९१०६४१०६४ हा क्रमांक दिल्ली पोलिसांनी ६ ऑगस्ट रोजी सार्वजनिक केला होता. या द्वारे कोणी पोलिस कर्मचारी लाच घेत असेल तर त्याचे ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठविण्याची सुविधा केली होती. परंतु, चंदर नावाच्या या व्यक्तीने या क्रमांकावर पॉर्न व्हिडिओ पाठविणे सुरू केले. 

दिल्ली पोलिसांनी या बाबत चंदरला विचारले असता त्याच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. आरोपी चंदर फरिदाबाद येथे राहतो आणि एका मॉलमध्ये काम करतो. दिल्ली पोलिसांनी लोकांना आवाहन केले की, हा सुविधेसाठी फोन देण्यात आला आहे, त्याचा चुकीचा वापर करू नये. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.