कन्फर्म : अतुल्य भारतमध्ये अमिताभ 'इन', आमीर 'आऊट'

अतुल्य भारत या केंद्रीय पर्यटन खात्याच्या अभियानासाठी नवा ब्रँड अँबेसिडर म्हणून बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावावर जवळपास  शिक्कामोर्तब करण्यात आलंय. 

Updated: Jan 7, 2016, 07:35 PM IST
कन्फर्म :  अतुल्य भारतमध्ये अमिताभ 'इन', आमीर 'आऊट' title=

नवी दिल्ली : अतुल्य भारत या केंद्रीय पर्यटन खात्याच्या अभियानासाठी नवा ब्रँड अँबेसिडर म्हणून बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावावर जवळपास  शिक्कामोर्तब करण्यात आलंय. 

अतुल्य भारत या जनजागृती अभियानासाठी अमिताभ बच्चन यांच्या नावाला मोदी सरकारचं सर्वप्रथम प्राधान्य असल्याची माहिती केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी सांगितलंय.

तसंच अक्षय कुमार, दीपिका पडुकोन आणि प्रियांका चोप्रा यांचीही नावं विचाराधीन असल्याचं शर्मा यांनी सांगितलंय. त्यामुळं गुजरातपाठोपाठ आता अमिताभ बच्चन अतुल्य भारतचेही ब्रँड अँबेसिडर म्हणून झळकणार आहेत. 

गेल्या दहा वर्षांपासून अभिनेता आमीर खान अतुल्य भारतचा ब्रँड अँबेसिडर होता. मात्र कंपनीचा कंत्राट संपल्याचं कारण पुढं करून केंद्र सरकारनं आमीरला या अभियानातून डच्चू दिल्याची चर्चा आहे. कारण आमीरनं असहिष्णूतेबाबत वादग्रस्त विधान करून मोदी सरकारचा रोष ओढवून घेतला होता.