'संसदेत महत्वाच्या विषयापेक्षा साडीवर जास्त गप्पा'

एखादा खासदार भाषण करत असतो, तेव्हा बाकीचे काय करत असतात? 

Updated: Jan 7, 2016, 07:11 PM IST
'संसदेत महत्वाच्या विषयापेक्षा साडीवर जास्त गप्पा' title=

दिल्ली : संसदेमध्ये एखाद्या विषयावर चर्चा सुरू असते, एखादा खासदार भाषण करत असतो, तेव्हा बाकीचे काय करत असतात? राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर विश्वास ठेवायचा तर ते टाईमपास करत असतात.

(व्हिडीओ पाहा सर्वात खाली)

जेव्हा चेन्नई पुरासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असते, इतर खासदारांची साड्यांसारख्या विषयांवर गप्पा मारत असतो असं त्या म्हणतायत.

नाशिकमध्ये तरुणींसाठी आनंदी उत्सव कार्यक्रमच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात महाविद्यालयीन तरुणींशी बोलताना संसदेत चालणाऱ्या गमतीजमती सांगत होत्या. त्यावेळी सुळे यांनी संसदेत खासदारांचं किती लक्ष असतं तेदेखील सांगून टाकलं.

पाहा तुम्ही स्वतःच ऐका सुळे काय म्हणतायत ते...