बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या आपल्या आगामी 'बेबी जॉन' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या तो प्रमोशन करत असून मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीत वरुण धवनने कशाप्रकारे एक महिला चाहती त्याच्या घरात घुसली होती याचा खुलासा केला आहे. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की, वरुण धवनला पोलिसांना बोलवावं लागलं होतं. आपल्यावर नजर ठेवून असणारी ही महिला एका ताकदवर व्यक्तीची पत्नी होती असाही खुलासा त्याने केला आहे. यादरम्यान त्याने काही किस्से सांगितले जेव्हा महिला चाहत्यांनी त्याला जबरदस्ती किस केला, पार्श्वभागावर चिमटा काढला ज्यामुळे त्याला मर्यादा ओलांडली जात आहे असं वाटलं.
रणवीर अल्लाबदियाशी त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना वरुणने शेअर केले की एकदा एक महिला त्याच्या परवानगीशिवाय त्याच्या घरात घुसली. “आणि ती बाई एका अतिशय शक्तिशाली माणसाची पत्नी होती. मी कोणती स्थिती सांगू शकत नाही… पण एक अतिशय शक्तिशाली माणूस, आणि तिला कॅटफिश केले जात होते. माझे नाव वापरून कोणीतरी तिच्याशी बोलत होते. तिला माझ्या घराबद्दल सर्व काही माहित होते आणि तिला वाटलं की मी माझं कुटुंब सोडून देईन. ते खूप भितीदायक होतं,” अशी आठवण वरुण धवनने सांगितली. आपल्याला नंतर पोलिसांना बोलवावं लागलं होतं असंही त्याने सांगितलं. “ती कोणासोबत तरी आली होती आणि ती एक कौटुंबिक गोष्ट बनली. तिथे महिला कॉन्स्टेबल होत्या आणि त्यांनी तिला हाताळलं,” असंही त्याने सांगितल.
वरुणने यावेळी कोणकोणत्या चाहत्यांचा सामना करावा लागला याबद्दलही सांगितलं आहे. लोक घरातून पळून आले होते. बीचवर तीन रात्र घालवल्या होत्या. आम्हाला पोलिसांना बोलवावं लागलं अशा आठवणी वरुण धवनने सांगितलं. यावेळी त्याने एका चाहतीने आपल्याला जबरदस्ती किस केल्याची आठवणही सांगितली. त्यावेळी तुला कसं वाटलं असलं विचारलं असता त्याने अजिबात आवडलं नसल्याची प्रतिक्रिया दिली. तुला मर्यादा ओलांडल्याची वाटलं का ? असा प्रश्न विचारला असता त्याने थोडंसं असं सांगितलं. काही लोकांनी माझ्या पार्श्वभागाला चिमटा काढला होता अशी आठवणही त्याने सांगितली.
वरुणने सांगितलं की, जेव्हा त्याच्यासोबत अशा प्रकारची घटना घडते, तेव्हा तो लगेच विचार करू लागतो की ते महिलांसाठी हे किती वाईट असेल. “मला स्त्रियांबद्दल वाईट वाटते कारण मी लगेच स्वतःला त्यांच्या स्थितीत आणतो. जर माझ्यासोबत हे घडत असेल तर त्यांच्या बाबतीत ते वाईटच असलं पाहिजे,” असं तो म्हणाला.