योगींनी घेतले महत्त्वाचे निर्णय

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिला सुरक्षेची दखल घेत, अॅन्टी रोमियो पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

Intern Intern | Updated: Mar 22, 2017, 04:36 PM IST
योगींनी घेतले महत्त्वाचे निर्णय title=

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिला सुरक्षेची दखल घेत, अॅन्टी रोमियो पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार उत्तर प्रदेशमधील अकरा जिल्हयांमध्ये एक विशेष अभियान सुरू करण्यात आल्याचे पोलीस महानिरीक्षक ए.सतीश गणेश यांनी आज सांगितले.
त्याचप्रमाणे कत्तलखाने बंद करण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

त्यानंतर अनेक कत्तलखाने बंद करण्यात त्यांना यश आले आहे. तसेच अवैध दारू विक्री आणि तस्करीवर बंदी घालण्यासाठी नवीन कायदे निर्माण करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे.