मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेला दोन मंत्रिपदे

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार शिवसेनेसाठी एक चांगली बातमी देणार आहेत. मोदी मंत्रिमंडळात शिवसेनेला दोन मंत्रिपदे मिळण्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, काही जणांना सरकारमधून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

Updated: Apr 2, 2015, 10:25 PM IST
मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेला दोन मंत्रिपदे title=

नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार शिवसेनेसाठी एक चांगली बातमी देणार आहेत. मोदी मंत्रिमंडळात शिवसेनेला दोन मंत्रिपदे मिळण्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, काही जणांना सरकारमधून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना ज्यांचे काम चांगले आहे. त्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. तर ज्यांचे काम समाधानकारक नाही, त्यांना डच्चू देण्याची तयारी करण्यात आली आहे. ज्यांच्यावर मोदी नाराज आहेत, त्यांना सरकारमधून बाहेरचा रस्ता दाखविला जाणार आहेत. मोदी सरकारचा हा दुसरा कॅबिनेट विस्तार आहे. ८ एप्रिला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे समजते.

शिवसेनेचे अनिल देसाई यांना मंत्रीपद तर आनंदराव अडसूळ यांना कॅबिनेट पद मिळण्याची शक्यता आहे. तसेच नजमा हेपत्तुला यांना हटवून मुख्तार अब्बास नक्वी यांना कॅबिनेट दर्जा मिळण्याची शक्यता आहे. नक्वी हे राज्यमंत्री म्हणून सध्या काम पाहात आहेत.

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी महबूबा मुफ्ती यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे. तर कलराज मिश्रा यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.