चंदीगढ : भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अशोक खेमका यांनी ट्विटरद्वारे भ्रष्टाचारावर खंत व्यक्त केली आहे, "भ्रष्टाचाराबद्दल बोलणे तसेच प्रचंड मर्यादा आणि हितसंबंध जोपासत असल्याने वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे कठीण आहे. हा क्षण अत्यंत दु:खदायक आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
अशोक खेमका हे असे आयएएस अधिकारी आहेत त्यांची २२ वर्षाच्या प्रशासकीय सेवेत ५० वेळा बदली झाली आहे.
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये खेमका यांची हरियानाच्या वाहतूक आयुक्त तसेच सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांची पुरातत्व विभाग आणि संग्रहालयाच्या महासंचालकपदी बदली केली आहे.
खेमका यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा आणि डीएलएफ कंपनी यांच्यामध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांचा जमीन गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आणले होते. विशेष म्हणजे हरियानामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना खेमका यांच्याविरुद्ध उगारलेले बदलीच्या अस्राबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान त्यांनी भ्रष्टाचाराबद्दल बोलणे तसेच प्रचंड मर्यादा आणि हितसंबंध जोपासत असल्याने वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे कठीण आहे. हा क्षण अत्यंत दु:खदायक आहे अशा शब्दात खंत व्यक्त केली आहे.
अशोक खेमका यांचा परिचय
अशोक खेमका हे असे आयएएस अधिकारी आहेत त्यांची २२ वर्षाच्या प्रशासकीय सेवेत ५० वेळा बदली झाली आहे. विविध विभागांमध्ये काम करताना त्यांनी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांना वेळोवेळी जीवे मारण्याच्या धमक्यांनाही सामोरे जावे लागते.
खेमका यांचा जन्म १९६५ साली पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे झाला आहे. त्यांनी आयआयटी खरगपूरमधून तंत्रज्ञानातील पदवी प्राप्त केली असून व्यवस्थापनशास्त्रातील पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली आहे. तसेच संगणकशास्त्र अभियांत्रिकी या विषयात त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.