'भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र येऊन अखंड भारत तयार होईल '

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे तीन भविष्यात एकत्र येऊन एक दिवस अखंड भारत तयार होईल असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केलाय. 

Updated: Dec 27, 2015, 11:17 AM IST
'भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र येऊन अखंड भारत तयार होईल ' title=

नवी दिल्ली : भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे तीन भविष्यात एकत्र येऊन एक दिवस अखंड भारत तयार होईल असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केलाय. 

अल जझिरा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे मत व्यक्त केलंय. एकत्री करणाच्या प्रक्रियेवर माझा ठाम विश्वास आहे. हे तिन्ही देश एकत्र येण्यासाठी युद्ध करणयाची आवश्यकता नाही.

युद्धाशिवाय लोकांच्या पुढाकारानेच ही प्रक्रीया घडेल असं ते म्हणालेत. मात्र ही एकत्री करणाची प्रक्रिया अशक्य असून त्याऐवजी दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणं गरजेचं असल्यांच काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर म्हणालेत.